काँग्रेस सरकारच्या कामांमुळे देशाचा कारभार सुरु आहे, संजय राऊतांचा मोदींना टोला

Sanjay Raut-PM Modi

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)सरकारला आज सात वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना काँग्रेस सरकारच्या कामांमुळेच देशाचा कारभार सुरू असल्याचे म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सात वर्षे पूर्ण झाली तरी अनेक विकासाची कामे प्रलंबित असल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी केली. सरकारची दोन वर्षे तर करोनाच्या लढ्यात निघून गेली. देशासाठी अजून बरंच काही करणं बाकी आहे. गेल्या ६० वर्षातील पंडित नेहरु ते राजीव गांधी, नरसिंह राव यांच्यापर्यंतचा जो लेखाजोखा आहे त्याच भरवश्यावर देशाचा कारभार सुरळीत सुरू आहे. नवीन काही झालेलं नाही पण जनता अपेक्षा करु शकते, असं संजय राऊत(Sanjay Raut) यांनी सांगितलं.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक वर्षे गेली, पण पंडित नेहरुंपासून ते राजीव गांधीपर्यंत, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्या सरकारने जे काम केले आहे त्यामुळेच  हा देश उभा राहिलेला दिसतो. या देशात अनेक योजना, प्रकल्प दिसत आहेत. देशाची अर्थव्यवस्था आपण पाहिली. काँग्रेस सरकारने केलेल्या कार्यामुळे आजही देश तग धरून आहे, मागची सात वर्षेसुद्धा, हे कोणालाही नाकारता येणार नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

सरकारला लोक निवडून देत असतील तर लोकांचा विश्वास आणि बहुमत मिळालेलं आहे. पण आजही देशात महागाई, बेराजोगारी आहे. करोनानंतर पसरलेली अराजकता कायम आहे. लोकांच्या मागण्या कमी असतात. प्रत्येकाला अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला व्हायचं नाही. फक्त रोजगार, रोजी रोटी मिळायला हवी. सात वर्षात देशातील जनतेला हे मिळालं का याचं चिंतन मोदींनी करायला हवं. मोदींकडे उत्तम नेतृत्वक्षमता आहे. आजही त्यांच्याकडून आपण ते देशाला योग्य दिशा, मार्ग दाखवतील अशी अपेक्षा करु शकतो. नरेंद्र मोदींनी जनतेच्या मनामध्ये असलेल्या अपेक्षांसाठी चिंतन करण्याची गरज आहे. लोकांची अपेक्षा पूर्ण झालेली नाही, हे सत्य आहे. मोदींच्या विरोधात अनेक पक्ष पुढे सरसावले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असेही राऊत म्हणाले. देशात अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी केंद्रातील सरकारने प्रयत्न करावेत, हीच विरोधी पक्षाची मागणी आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी उत्तमपणे काम करत आहेत. त्यांचा दृष्टिकोन पटण्यासारखा आहे, असेही राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button