या धनगर नेत्याच्या आंदोलनामुळं पवारांना वाटली होती मुख्यमंत्रीपद गमावायची भीती

या धनगर नेत्याच्या आंदोलनामुळं पवारांना वाटली होती मुख्यमंत्रीपद गमावायची भीती

आजच्या घडीला एसटी प्रवर्गासाठी आक्रमक आंदोलन करणाऱ्या धनगर समाजाला त्यांना एसटी प्रवर्गात आरक्षण मिळू शकतं याची कल्पनाही नव्हती. गावकुसाबाहेर राहणारा धनगर समाज न कोणत्या आंदोलनात सहभाग घ्यायचा न मुलभूत हक्कांबद्दल त्यांना जागृती होती. पण अशा प्रतिकूल परिस्थीतीत धनगर समाजात जागृती करण्याचं काम केलं ते बी.के कोकरे अर्थात बापूसाहेब कोकरे यांनी. समस्त धनगर समाजाला न्याय हक्कासाठी मैदानात उतरणावणाऱ्या बी.के कोकरे यांची राजकीय विश्लेषकांनी दखल घेतली नाही.

नेमका त्यांचा जीवनप्रवास कसा होता. धनगर समाजाच्या (Dhangar Community) उद्धारात त्यांच काय योगदान आहे त्याच्यावरती टाकलेली एक नजर.

धनगर समाजाच्या प्रबोधनासाठी सुरु झालेली पहिली चळवळ म्हणजे यशवंत सेना. या यशवंत सेनेचे संस्थापक होते बी. के. कोकरे. बारामतीच्या उंटवाडी कडेपठार या गावात त्यांचा जन्म झाला. सामान्य धनगर कुटुबांत अत्यंत खडतर परिस्थीतीतून त्यांनी वाट काढली. बारामतीत जन्मलेल्या बी. के. कोकरे यांनी बारामीतच दहावी- बारावीचं शिक्षण पहिल्या क्रमांकानं पूर्ण केलं. याच गुणांच्या जोरावर त्यांनी मुंबईच्या ‘युनिवर्सीटी ऑफ केमिकल एँड टेक्नोलजी’ या विद्यापीठातून पेट्रोकेमिकल इंजीनिअरींगचं शिक्षण घेतलं. त्यांच्या या शिक्षणाच्या टप्प्यात त्यांना आलेले अनूभव, बदलणारं जग, प्रगतीच्या वाटा त्यांना खुणावत होत्या तर दुसऱ्या बाजूला अत्यंत कष्टात रानोमाळ भटकत जगणारा धनगर समाजाची होणारी हाल अपेष्टा त्यांना बघवत नव्हती.शिक्षणाच्या जोरावर परदेशात जावून लाखो रुपये कमावयची त्यांना संधी होती पण शिक्षण घेत असताना बसलेले आर्थिक चटके आणि सामाजीक अवहेलना पुढच्या पिढीच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी संघटनेची उभारणी केली.

दुचाकीवरुन पिंजून काढला महाराष्ट्र

यशवंत सेनेची स्थापना झाली. जुनी दुचाकी आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले. आरक्षणामुळं सामाजिक, आर्थिक स्तर सुधारतो याची कल्पना देखील निरक्षरतेमुळं धनगर समाजाला नव्हती. सलग दहा वर्षे त्यांनी दौरे केले, यशवंत सेना महाराष्ट्रात रुजवली, वाढवली.

धनगर समाजाला आंदोलनासाठी तयार केलं. डोंगरदऱ्यात फिरणाऱ्या आणि माळावर पाल टाकूण राहणारा धनगर समाज १९८९ ला आंदोलनात उतरला. धनगरांच्या मनात क्रांतीची मशाल बी.के. कोकरेंनी प्रज्वलीत केली होती. मेंढपाळांच्या हक्कांसोबतच धनगरांना ST चं आरक्षण मिळावं म्हणून डॉ. बी.व्ही. शेंबडेंच्या मार्गदर्शनाखाली कोकरेंच्या यशवंत सेनेनं धनगरांच्या एस.टी. आरक्षणासाठी तीव्र लढा उभारला.

१९८८ ला शरद पवार (Sharad Pawar) राज्याचे मुख्यमंत्री होते

धनगर आरक्षणाचा लढा शिगेला पोहचला होता. आर या पारची लढाई रंगली होती. बी.के. कोकरेंची भाषणं लोकं जीवाचं कान करुन ऐकायची. मोठ मोठे मोर्चे मेळावे भरु लागले. धनगर समाजाचे संख्याबळ बघता आगामी विधानसभा निवडणूकीत मोठा फटका बसू शकतो.

धनगरांची नाराजी परवडण्यासारखी नाही. ही गोष्ट पवारांना माहिती होती. पवारांनी या आंदोलनाला शांत करण्यासाठी अनेक उपाय योजन योजायला सुरुवात केली. धनगरांना एसटीत आरक्षण देण्यासाठी पवारांनी त्यावेळी पुढाकार घेतला असता तर मागणी सहजमान्य झाली असती. समाजाची परिस्थीती बदलली असती. असं समाजातील नागरिकांचं म्हणनं होतं. पण तरी पवारांनी एसटीत आरक्षण न देता एनटी प्रवर्गात धनगरांना आरक्षण दिलं. या मागे पवारांचा काही राजकीय हेतू होता का? अशाही शंका काहीजण उपस्थित करतात. एसटी आरक्षणामुळं पश्चिम महाराष्ट्रातले मतदार संघ आरक्षित होतील आणि पवारांच्या मर्जीतल्या लोकांना त्यांचे विधानसभा लोकसभा मतदार संघ सोडावे लागतील.म्हणून त्यांचा एसटी आरक्षणाला विरोध होता, असा एक प्रवाद यशवॆत सेनेच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो.कारण एनटी प्रवर्गासाठी राजकीय आरक्षण नाही, त्यामुळं धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षणाची मागणी असतानाही पवारांनी एनटी प्रवर्गात आरक्षण दिलं.असा एक विचार प्रवाह धनगर समाजात आहे.

शिवाजी बापू शेंडगेंना जवळ करुन संपवला बी. के. कोकरेंचा प्रभाव?

धनगर आंदोलनाचे नेतृत्व स्वतः बी.के. कोकरे करत होते. त्यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता. बी.के. कोकरेंशी वाटाघाटी करणं शक्य नव्हतं, कारण ते एसटी आरक्षणाची मागणी करत होते. म्हणून पवारांनी धनगर समाजातील मुंबईत राहणाऱ्या आणि राजकारणाशी या आधी संबंध नसलेल्या शिवाजीराव शेंडगेंना निवडूण आणलं. आणि त्यांना धनगरांचे प्रतिनिधी म्हणून घोषित करत एनटीच आरक्षण घ्यायला लावलं, असं यशवंत सेनेत काम केलेल्या जुन्या कार्यकर्त्याचे म्हणणे आहे. बी के कोकरेंचा प्रभाव संपवण्यासाठी पवारांनी ही खेळी केली ते सागंतात.

धनगर समाज आजही शैक्षणिक व राजकीय आरक्षणापासून वंचित आहे. बी.के. कोकरेंनी उभारलेल्या या लढ्यामुळं धनगरांतून अनेक डॉक्टर्स, इंजिनिअर्स बनले. नंतरच्या काळात शरद पवारांनी शिवाजीराव शेंडगेंना जवळ करुन कोकरेंचा प्रभाव संपवल्याचं अनेक जाणरांचं म्हणणं आहे. आज कोकरे हयात नाहीत पण त्यांना स्मरुण पुन्हा ST आरक्षणासाठी धनगर समाज आंदोलनाला सज्ज झाल्याचं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER