कठोर निर्बंधामुळे विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन होणार, उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

Uday Samant

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने कठोर निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन घेणे अशक्य झाले आहे. विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, असं स्पष्टीकरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतयांनी (Uday Samant) आज माध्यमांशी बोलताना दिले.

याबाबत माहिती देताना सामंत म्हणाले की, आज कुलगुरूंसोबत परिक्षासंदर्भात बैठक पार पडली. तेराही विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन सुरू होत्या. आता ऊर्वरीत सर्व परिक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय झाला आहे. उच्च शिक्षण विभागातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत गणला जावा, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार आहोत. यामुळं निकाल लवकर लागेल. राज्यातील ३७ लाख कॉलेज विद्यार्थ्यांचे लसीकरण विद्यापीठांमार्फत करण्याचा आमचा संकल्प आहे. १८ ते २५ वयोगटातील हे विद्यार्थी आहेत त्यामुळं त्याचं लसीकरण होणं गरजेचे असल्याचे सामंत म्हणाले.

लॉच्या विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशासाठी मुदत वाढवून देणार आहोत. प्राध्यापक भरतीबाबतही चर्चा झालीय. ही भरती करणार आहोत. फक्त कोविड संकट कमी झाल्यावर होईल, प्राध्यापक भरती होणार नाही, अशा चर्चांवर विश्वास ठेवू नये. तेराही अकृषी विद्यांपीठात उद्यापासून ऑफलाईन परीक्षा होणार नाही. एकही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. टीवायचीही परिक्षा ऑनलाईन असेल, असं उदय सामंत म्हणाले.

एनसीसी व एनएसएसच्या प्रमुखांशी बोलणार आहे. हे विद्यार्थी लसीकरण मोहिमेत स्वयंसेवक म्हणून सहभागी होतील. संजय ओक यांनी तसं आवाहन केले होते. त्यांच्याशीही मी बोलणार आहे. रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात ऑक्सिजन कमतरता नाही. लस व रेमडेसिव्हीरचं समान वाटप केंद्राने करावे, असं उदय सामंत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button