संघामुळेच ईशान्येकडील राज्य भारतात : सरसंघचालक मोहन भागवतांचा दावा

Mohan Bhagwat

नागपूर :- ईशान्येकडील राज्यांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवकांनी केलेल्या कार्यामुळे परिस्थिती बदलली असून ती राज्ये यामुळेच आज भारतात असल्याचा दावा संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. अरुणाचल प्रदेशातील परिस्थितीवर एका स्वयंसेवकाने लिहिलेल्या ‘शुभारंभ’ या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

भागवत म्हणाले की, 50 वर्षांपूर्वी काही लोकांनी ( स्वयंसेवकांनी ) तिथे जाऊन सेवाकार्य सुरु केले आणि आजही ते सुरु आहे, काही वर्षांपूर्वीपर्यंत ईशान्येकडील राज्य भारतापासून वेगळे होतील, आसामचे काश्मीर होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. आता परिस्थिती बदलली आहे. तिथले लोक भारतात राहू इच्छितात. त्यामुळे ही परिस्थिती बदलणे शक्य झाल्याचे ते म्हणाले.

आज अरुणाचल प्रदेशात भारतात्या बाजूने आणि चीनच्या विरोधात मोर्चे काढले जात आहेत. परिस्थितीतील हे बदल स्वयंसेवकांनी 50 वर्षांपूर्वई आपुलकीच्या भावनेतून आणि स्वयंप्रेरणेतून तिथे जाऊन कार्य सुरु केले होते आजही ते अविरतपणे सुरु असल्याचे मोहन भागवत म्हणाले. ईशान्येकडील राज्यांतील लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल काही लोक बोलतात. परंतू हे लक्षात ठेवायला हवे की त्यासाठी आपणही तितकेच जबाबदार आहोत. जेव्हा ईशान्येकडील राज्यातून लोक दिल्लीत येतात. तेव्हा काही लोक त्यांना चीनचे असल्याचे स‍ंबोधतात, हा आपला देश आहे. आपण त्यांना परके मानतो. ही आपली चूक आहे.

देशातील नागरिकांनी ईशान्यकडील लोकांबद्दलचा दुरावा दूर केला तर समस्या सुटतील.