प्रदूषणामुळे सोनिया गांधींनी दिल्ली सोडली, काही दिवस गोव्यात मुक्काम

Sonia Gandhi

दिल्ली :- शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांनी दिल्ली शहर सोडलं आहे. पणजीला पोहचले आहेत. पुढचे काही दिवस ते गोव्यात राहणार आहेत.

दिल्लीची हवा मानवत नसल्याने सोनिया गांधी यांना काही दिवसांसाठी शहर सोडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिली होता.
दरम्यान, बिहारच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षात कुरबुरी सुरू झाल्या आहेत. कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला घरचा अहेर देत, बिहारचा पराभव ही आपल्याला सामान्य बाब वाटते आहे असे म्हटले. यासाठी सलमान खुर्शीद आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कपिल सिब्बल यांच्यावर टीका करून राहुल यांचा बचाव केला. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी दिल्ली सोडल्यानंतर या वादावर पडदा पडणार की हा वाद आणखी वाढणार हे लवकरच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER