नाकामुळे हेमा मालिनीने साईन केले होते शाहरुख खानला

Hema Malini and Shah Rukh Khan

शीर्षक वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटले असेल. परंतु हे खरे आहे. शाहरुख खानला (Shah Rukh Khan) दिल आशना है साठी हेमा मालिनी यांनी त्याचे नाक पाहूनच साईन केले होते. स्वतः शाहरुख खाननेच किस्सा सांगितला होता. माझे नाक वेगळे असल्याने मी ते नेहमी लपवण्याचा प्रयत्न करीत असायचो. मी चित्रपटसृष्टीत संघर्ष करीत असताना माझे नाक कसे लपवता येईल याचा विचार करीत होतो.

दीवाना चित्रपटाचे शूटिंग मी सुरु केले परंतु त्यापूर्वीच हेमा मालिनी (Hema Malini) यांनी मला दिल आशना है साठी साइन केले होते. एकदा शूटिंगच्या वेळेस गप्पा मारताना हेमा मालिनी यांनीच मला सांगितले होते की, नाकामुळेच मी तुला साईन केले. तेव्हा मला आश्चर्य वाटले होते. परंतु हेमा मालिनी (Hema Malini) म्हणाल्या होत्या, तुझे नाक खूपच सुंदर आणि वेगळे आहे. या नाकामुळेच मी तुला चित्रपटात संधी दिली.

हेमा मालिनीसारख्या ड्रीम गर्लकडून जे नाक मी लपवण्याचा प्रयत्न करायचे त्याची प्रशंसा ऐकून मला खूप बरे वाटले, मी स्वतःला खूप नशीबवान मानतो असेही शाहरुखने म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER