लॉकडाऊनमुळे ब्रह्मपुत्रा झाली प्रदूषणमुक्त 

गौहाटी : लॉकडाऊनमुळे आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी स्वच्छ झाले आहे. कारण कारखान्यांमध्ये वापरलेले पाणी या नदीत सोडले जाते. लॉकडाउनमुळे कारखाने बंद आहेत त्यामुळे नदीत रसायन मिसळलेले प्रदूषित पाणी येणे थांबले आहे. नदी स्वच्छ झाली आहे.

याआधी – गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी, पंचगंगा या नद्यांचेही पाणी लॉकडाऊनमुळे स्वच्छ झाल्याचे लक्षात आले आहे. ब्रह्मपुत्रा नदीला आसामचे अश्रू म्हणतात असे वाक्य भूगोलाच्या पुस्तकात आहे. कारण, या नदीला पूर आला तर आसाम जलमय होतो. ANI ने यासंदर्भातला व्हीडीओ प्रसारित केला आहे. इंडस्ट्रीय एरियात पूर्ण शटडाउन आहे. त्यामुळे प्रदूषित किंवा केमिकलयुक्त पाणी ब्रह्मपुत्रा नदीत सोडले जात नाही. नदीच्या विशाल पात्रात स्वच्छ पाणी वाहताना दिसते.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देश लॉकडाउन करण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत पुकारण्यात आलेला लॉकडाउन कदाचित वाढूही शकतो. या सगळ्या परिस्थितीचा अनेक लोकांना त्रास होतो आहे मात्र निसर्गावर या लॉकडाउनचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.