‘लोजपा’मुळे नितीश कुमारांच्या ३० जागा गेल्या

nitish kumar

पाटणा :- बिहारमधील सत्तारूढ एनडीएमधून बाहेर पडून स्वबळावर लढणाऱ्या लोक जनशक्ती पार्टीची (Lok Janshakti Party) वाट लागली. मात्र, तिने जेडीयूला ३० जागांचा तडाखा दिला, असे आतापर्यंत झालेल्या मतमोजणीतून दिसते आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू आणि लोजपामध्ये मोठी दरी निर्माण झाली. लोजपा विधानसभा निवडणुकीआधी एनडीएमधून बाहेर पडली. नितीश आणि जेडीयूविरोधात प्रचार केला.

लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) निवडणूक काळात सतत, आम्ही भाजपासोबत सरकार स्थापन करू, असा दावा करत होते. मात्र, त्यांना आतापर्यंत खातेही उदघडता आले नाही. लोजपाला सरकार स्थापनेत काहीच महत्व उरले नाही. मात्र, जेडीयूचे संख्याबळ लक्षणीय प्रमाणात घटवण्यात लोजपा फॅक्‍टर महत्वाचा ठरल्याचे दिसते आहे.

लोजपाने प्रामुख्याने जेडीयूविरोधात उमेदवार रिंगणात उतरवले. त्यामुळे जेडीयूला ३० जागा गमवाव्या लागल्या असा अंदाज आहे.

दरम्यान, जेडीयूला रोखण्यासाठी भाजपा आणि लोजपाने छुपा समझोता केल्याची चर्चा आहे. दोन्ही पक्षांकडून त्याचा वारंवार इन्कार करण्यात आला आहे.

ही बातमी पण वाचा : तेजस्वीच्या रुपाने नवं नेतृत्व तयार व्हावे यासाठी बिहारकडे लक्ष दिले नाही – शरद पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER