समन्वयाच्या अभावाने अजित दादांच्या मतदार संघातच ‘रेमडीसिवीर’ इंजेक्शनचा तुटवडा

Ajit Pawar-remedicivir-injection

बारामती :  कोरोना (Corona) संसर्गावर सध्या कोणती लस उपलब्ध झाली नसली तरी कोरोनामुळे गंभीर अवस्थेतील रुग्णांवर ‘रेमडीसिवीर’ इंजेक्शन देवगुणी ठरले आहे. मात्र, अनेक ठिकामी मोफत इंजेक्शन पुरवणा-या शरद पवारांच्या बारामतीतच ‘रेमडीसिवीर’ इंजेक्शनचा (Remedicivir injection) तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन (injections) मिळविण्यासाठी मेडिकल व्यावसायिकांच्या दारोदारी भटकण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, कोरोनाचा आलेख वाढल्यानंतर बारामतीत रुग्णांवर शासकीय पातळीवर प्रभावी उपचार करण्यासाठी प्रशासन यशस्वी ठरत आहे. प्रशासनाने ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर यंत्रणा बसविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले. कोरोनाच्या रुग्णांना सेवा देण्यासाठी बारामतीतील प्रशासन तत्पर असले तरी, समन्वयाच्या अभावाने कोरोनावर देवदूत ठरलेल्या ‘रेमडीसिवीर’ इंजेक्शनचा तुडवडा निर्माण झाला आहे.

हे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णाला कोरोना संसर्ग झाल्याचा अहवाल, रुग्णाचे आधारकार्ड तसेच इंजेक्शन आणणाऱ्या व्यक्तीचे आधारकार्ड घेतले जात आहे. त्यानंतरच हे इंजेक्शन देण्यात येते. प्रतिरुग्ण १ ते २ इंजेक्शन सध्या उपलब्ध होत आहे. शुक्रवारी (दि.१८) दुपारपासूनच या इंजेक्शनचा शहरात तुटवडा निर्माण झाला. केवळ बारामतीच नव्हे तर आसपासच्या फलटणसह इतर तालुक्यातून हे इंजेक्शन मिळविण्यासाठी बारामतीमध्ये रुग्ण येत आहेत.

शनिवारी (दि.१९) दुपारी १२ च्या दरम्यान बारामती शहरात हे इंजेक्शन उपलब्ध झाले. ते मिळविण्यासाठी कोविड उपचार केंद्राच्या ठिकाणी झुंबड उडाली होती. अत्यवस्थ रुग्णासाठी उपचार केंद्राकडून नातेवाईकांना तातडीने हे इंजेक्शन आणण्यास सांगितले जाते. मात्र यावेळी कोणत्या ठिकाणी इंजेक्शन उपलब्ध आहे याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती मिळत नाही. एकीकडे कोरोना संसर्गमुळे अत्यवस्थ झालेला रुग्ण आणि दुसरीकडे या इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे नातेवाईक हतबल झाले आहे. इंजेक्शन न मिळाल्यास आपल्या रुग्णाचे काय होणार या चिंतेपोटी नातेवाईक संबंधितांचे उंबरठे झिजवतात. यापार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेने यामध्ये समन्वय ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER