योगी आदित्यनाथ याचे मूळ नाव घेतल्याने युवकाचा काँग्रेसच्या पत्रपरिषदेत गोंधळ

Yogi adityanath-congress

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अजय सिंह बिश्ट(मूळ नाव) म्हणणे भारतीय संस्कृतीचा अपमान असल्याचे म्हणत एका व्यक्तीने अचानक तिरंगा हातात घेून काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोंधळ घातला. तसेच त्याने वंदे मातरम, भारत माता की जयच्याही घोषणा दिल्या. त्यामुळे पत्रकार परिषदेत एकच खळबळ उडाली.

ही बातमी पण वाचा:- सुप्रिया सुळेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला कार्यकर्त्यांकडून चोप!

महाराष्ट्रातील हिम्मतनगर येथील रहिवाशी असलेल्या या व्यक्तीचं नाव नचिकेता वाल्हेकर असून, तो भाजपा कार्यकर्ता असल्याचेही म्हटले जाते. तो म्हणाला, त्यांची ममता बॅनर्जींचे नाव घेण्याची हिंमत होत नाही. त्यांना निवडणूक सांभाळता येत नाही. असे लोक फक्त मोदी-शहा, मोदी-शहा करतात. मोदी-शाहांनी देशासाठी बरेच काही केलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशमधील कायदा-सुव्यवस्था सांभाळण्यात अपयश आल्याचे म्हटले आहे. लोकसभेत होत असलेल्या पराभवामुळेच काँग्रेस असे आरोप करत असल्याचेही तो म्हणाला आहे.

रायबरेलीमध्ये काँग्रेसचे आमदार अदिती सिंह झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत पवन खेडा म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये जी हिंसा झाली, आमच्या आमदारावर जीवघेणा हल्ला झाला. आज प्रियंका तिकडे गेल्या आहेत. इथे आपल्याला मोदी-शाह मॉडल दिसेल. मोदी-शाह मॉडल बंगालमध्येही आहे आणि उत्तर प्रदेशमध्येही आहे. मोदी-शाहांचे फक्त 8-9 दिवस बाकी आहेत, असेही काँग्रेसवाले म्हणाले आहेत.