ग्रामपंचायत निवडणुकीमुळे 19 जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहणार

farmers

मुंबई : ग्रामपंचायत निवडणूका असल्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची दुसरी यादी 19 जिल्ह्यात लागू होणार नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील कर्जमाफी दोन महिने रखडणार आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जमाफीतून वंचित राहात असलेल्या 19 जिल्ह्यांना आचारसंहितेतून वगळावे असा प्रस्ताव सरकारकडे निवडणूक आयोगापुढे ठेवला आहे.

राज्यतील जवळपास 19 जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अचारसंहितेचा भंग होऊ नये याची काळजी राज्य सरकार घेत आहे. ग्रामपंचायत निवडणुका पार पडत असलेल्या जिल्ह्यांत शेतकरी कर्जमाफी यादी निवडणुका पार पडल्यानंतर जाहीर केली जाणार आहे. मात्र, या यादीमध्ये राज्यातील ठाणे, रायगड,रत्नागिरी, नंदुरबार, कोल्हापूरसह सुमारे 19 जिल्ह्यांचा समावेश असणार नाही.

ग्रामपंचायत निवडणुका असलेले जिल्हे
कोल्हापूर- 4, औरंगाबाद – 7, नांदेड – 100, अमरावती – 526, अकोला – 100, अमरावती – 526, अकोला – 1, यवतमाळ – 461, ठाणे – 13, रायगड – 1, रत्नागिरी-8, नाशिक – 102, जळगाव – 2, नगर – 2, नंदुरबार – 38, पुणे – 06, सातारा – 2

महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेची पहिली यादी 24 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्याअखेर या योजनेच्या अंमलबजावणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यातील 34 लाख 83 हजार 908 खात्याची माहिती संकलित केली. त्यापैकी 68 गावातली यादी जाहीर करण्यात आली होती. कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिले जात आहे. जिल्हा पातळींवर कर्जमाफीचे काम सुरु झाले आहे.