देवेंद्र फडणवीसांमुळे बहुजनांची पोरं आमदार झाली : सदाभाऊ खोत

Sadabhau Khot - Devendra Fadnavis

सांगली :- जीवापाड प्रेम करणाऱ्यांमुळेच गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आमदार झाले. सोन्यासारखी माणसं लाभलेल्या आमदार पडळकरांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी चप्पल वर्ज्य केले. फडणवीसांमुळे बहुजनांची पोरं आमदार झाली, असे प्रतिपादन माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केले.

झरे येथे सन्मान सोहळ्यात पडळकर आमदार झाल्याशिवाय चप्पल न घालण्याचा पण करणाऱ्या दत्तात्रय कटरे, नारायण पुजारी आणि केस दाढीचे पैसे न घेणाऱ्या दिवंगत जालिंदर क्षीरसागर यांच्या कुटुंबियांना पडळकर यांनी चांदीची चप्पल आणि दुचाकी देऊन गौरव केला.

माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार जयकुमार गोरे, गोपीचंद पडळकर, राजेंद्र अण्णा देशमुख, ब्रम्हानंद पडळकर, जि. प. अध्यक्ष प्राजक्ता कोरे, सभापती भूमिका बेरगळ, उपसभापती दादासो मरगळे, अण्णासाहेब पत्की यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी खोत म्हणाले, देशमुख-पाटील आमदार होणं आणि खोत, गोरे,पडळकर आमदार होणं वेगळं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामुळे ही किमया घडली. पडळकर यांच्याकडून कार्यकर्त्यांवर कसे प्रेम करावे ही शिकण्याची गरज आहे.

पडळकर म्हणाले, मी आमदार व्हावे म्हणून चप्पल न घालणाऱ्यांची चेष्टा करण्यात आली. परंतु ते डगमगले नाहीत. या जिवाभावाच्या लोकांमुळे मी आमदार झालो. माझ्या कातड्याचे जोडे घातले तरी हे उपकार फिटणार नाहीत. पडळकर आमदार झाल्यावरच फेटा बांधण्याची घोषणा करणारे अमरसिंह देशमुख यांचाही आज सन्मान केला जाणार होता. परंतु ते कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख मात्र उपस्थित होते. अमरसिंह देशमुख यांच्या अनुपस्थितीची चर्चा सुरू होती.

ही बातमी पण वाचा : हे सरकार दारुडे – सदाभाऊ खोत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER