शाळांची गुणवत्ता घसरल्याने 30 शिक्षकांना नोटीस

Teacher

नागपूर : शिक्षण विभागाने भरारी पथकाच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले. अशा ३० शाळेच्या शिक्षकांना शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची घसरलेली पटसंख्या, सोबतच होत असलेली गुणवत्तेची घसरण थांबविण्यासाठी विभागीय आयुक्तांनी अध्ययन निष्पत्ती कार्यक्रम जिल्हाभर राबविला. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पदभार स्वीकारला

यासाठी उपशिक्षणाधिकारी ढवंगळे व आगरकर यांच्या नेतृत्वात दोन भरारी पथके नेमण्यात आली. प्रत्येक पथकात सहा सदस्य आहे. यात विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांचाही समावेश आहे. पथकाद्वारे उलट तपासणी सुरू आहे. पथक विशेषत: दुर्गम भागातील शाळा व कमी पटसंख्येच्या शाळांना भेटी देत आहेत. ज्या शाळेतील विद्यार्थ्यांची भाषा व गणित विषयात गुणवत्ता कमी आढळली, त्या शाळेच्या शिक्षकांचा पथकाकडून अहवाल तयार करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत विशेष परिणाम झाला नाही. भाषा आणि गणित या विषयात अजूनही विद्यार्थी कमजोरच आहेत. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली की नाही, याची पाहणी करण्यासाठी जि.प. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी शाळांना भेटी देणे सुरू केले.