कोरोनामुळे कोल्हापुरातील मालिकांचे चित्रीकरणवेळी टीम दक्ष

Movies

कोल्हापूर : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता (Ashalata Wabgaonkar) यांचा सातारा (Satara) जिल्ह्यातील चित्रीकरणादरम्यान कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील टीव्ही मालिका चित्रीकरण युनिटच्या सेटवर कमालीची सतर्कता बाळगली जात आहे. बहुतांश मालिकांच्या दिग्दर्शकांनी चित्रीकरण सेटवरील मनुष्यबळात 50 टक्के कपात केली आहे. प्रत्येक सीन शूटनंतर हात सॅनिटाईज करणे, गर्दी टाळण्यासाठी प्रसंगी सीनमध्ये तडजोड केली जात आहे.

जिल्ह्यातील जैनापूर येथील ‘जीव झाला येडापिसा’ आणि केर्ली येथील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांच्या सेटवर कोरोना बाधा टाळण्यासाठीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. दोन्ही मालिकांच्या दिग्दर्शकांनी ‘आम्ही आता खूप सतर्क झालो आहोत. खूप काळजी घेत आहोत, असे सांगितले. मात्र पोटाचा प्रश्नही गंभीर झाल्याने धोका पत्करावा लागतो’, अशी भावना काही अभिनेत्रींनी बोलून दाखवली.

हादिर्क जोशी ऊर्फ राणा, अक्षया देवधर ऊर्फ अंजली हे केर्ली येथे मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. शासन नियमांचे पालन करूनच चित्रीकरण करण्याकडे कटाक्षाने लक्ष देत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER