मुंबईत कोरोना वाढल्याने राकेश रोशन कुटुंबासह गेला लोणावळ्याच्या बंगल्यात

Maharshtra Today

मुंबईत गेल्या एक-दीड महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. नुसतेच डोके वर काढले आहे असे नाही तर हातपायही चांगलेच हलवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईत आता रोज साधारणतः ४ ते ५ हजार कोरोनाग्रस्तांची नोंद होऊ लागली आहे. मुंबईतील कोरोनाची ही स्थिती पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ मार्चपासून रात्रीच्या कर्फ्यूची घोषणा केली आहे. बॉलिवूडच्या अनेकांना कोरोनाने ग्रासले आहे. मुंबईतील कोरोनाची ही गंभीर स्थिती पाहून राकेश रोशनने (Rakesh Roshan) सपरिवार मुंबई सोडली असून तो लोणावळ्याला कुटुंबासह वास्तव्यास गेला आहे. मुंबईतील कोरोना आटोक्यात आल्यानंतर मुंबईला राकेश रोशन परतणार आहे.

काही दिवसांपूर्वीच राकेश रोशनने कोरोनाची लस घेतली होती. हृतिक रोशनने (Hrithik Roshan) त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर राकेश रोशनने कोरोना लस घेतल्याचे फोटो टाकले होते. कोरोनाची लस घेतली असली तरी कोरोनाचा अन्य कोणत्या तरी मार्गाने घरात प्रवेश होऊ नये म्हणून राकेश रोशनने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. राकेश रोशन पत्नी पिंकी आणि मुलगी सुनैनासोबत लोणावळ्याच्या बंगल्यात राहाण्यास गेला आहे. हृतिक रोशन मात्र त्याच्या दोन्ही मुलांसह मुंबईतच आहे. काही महत्वाचे काम असेल तरच राकेश रोशन मुंबईला येणार आहे. राकेश रोशनने मुंबई सोडण्याबाबत सांगितले की, मुंबईत कोरोनाचा कहर वाढू लागल्याने आम्ही लोणावळ्याला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत मुंबईतील कोरोना संपत नाही तोपर्यंत आम्ही लोणावळ्यालाच राहाणार आहोत. लोणावळ्याच्या बंगल्यात राकेश रोशन ‘क्रिश ४’ च्या स्क्रिप्टचे काम पूर्ण करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER