कोरोनामुळे ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Female Thane Police Officer-Corona die

ठाणे : कोरोनासाठीच्या बंदोबस्तात पोलीस लोकांच्या संपर्कात येत असल्याने पोलिसांना कोरोनाचा धोका जास्त आहे. त्यातच आता ठाणे शहर पोलीस विभागात शिपाई पदावर असलेल्या महिला कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती ठाणे पोलिसांनी ट्विट करून दिली आहे.

श्रीनगर पो.ठा येथील पोलीस शिपाई श्रीमती प्रतिभा गवळी, वय ४५ वर्षे यांचे कोरोनाशी झुंज देताना दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.ठाणे शहर पोलीस त्यांच्या दुःखात सहभागी आहेत. आमच्या सद्भावना नेहमीच त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतील. असे ट्विट करत ठाणे पोलिसांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला