मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘त्या’ निर्णयाने शिवसेना आमदार खूश तर राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी

मुंबई :- उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी (TMC) पाणी देण्यास सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी तीव्र विरोध केला होता. याच पाणीप्रश्नावरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही निशाणा साधला होता. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवसेना (Shivsena) आमदाराची दखल घेत उजनी धरणातून इंदापूरसाठी पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केला आहे. उद्धव ठाकरेंच्या या निर्णयावरून राष्ट्रवादीच्या गोटात नाराजीचे वातावरण आहे.

इंदापूरला पाणी न दिल्याबद्दल इंदापूरच्या स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी उजनी धरणावर आंदोलन केले.

इंदापूरला उजनीचे पाणी द्यावे अशी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची मागणी होती. यावरून सोलापूरचे आमदार नाराज झाले होते. सोलापूरचे (Solapur) पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सोलापूरचं पाणी पळवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत थेट शरद पवारांवर निशाणा साधला होता.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रालाही ‘तौक्ते’चा फटका, मग पंतप्रधानांचा भेदभाव का? राष्ट्रवादीच्या नेत्याचा सवाल 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button