तीनही पक्षांतील महत्त्वाकांक्षी लोकांमुळेच सरकार कोसळेल : रावसाहेब दानवे

जालना : राज्य सरकार आमच्या सरकारच्या काळातील अनेक कल्याणकारी योजनांना स्थगिती देत आहे, ही बाब चांगली नसून हे सरकार तीन पक्षांतील महत्वाकांक्षी लोकांमुळेच कोसळेच, असा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.

पर्यटनाच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न : आदित्य ठाकरे

नुसत्या जालना जिल्ह्यामधील सुमारे ५५ कोटी रूपयांपेक्षा अधिक योजनांना स्थगिती दिलेली आहे. महापोर्टल असो की, जलयुक्त शिवार अशा अनेक योजनांना निधी देणे बंद करून त्या चुकीच्या असल्याचा डांगोरा सरकार पिटत असल्याचे दानवे म्हणाले.

आपण केंद्रातून जालन्याच्या विकासासाठी निधी आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेवर टीका एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी बंगळुरु येथे दोन दिवसांपूर्वी शंभर कोटींना १५ कोटी भारी असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य चुकीचे असून, आपण त्याचा निषेधच करतो. शिवसेनेने याबद्दल अधिक भूमिका घेणे अपेक्षित होते; परंतु आता शिवसेनेची स्थिती ही शेपूट तुटलेल्या वाघासारखी असल्याचा टोलाही दानवे यांनी लगावला.