शिवसेनेच्या ‘ऐतिहासिक’ दसरा मेळाव्यावर कोरोनाचे संकट; उद्धव ठाकरे देणार ‘ऑनलाईन’ भाषण

Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट (Corona crises) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी सुरू केलेल्या दसरा मेळाव्यावर (Dussera Melava) यंदा कोरोनाचे सावट आहे .

२५ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. या वर्षीचा दसरा मेळावा शिवसैनिकांसाठी विशेष असणार आहे. शिवसेनेची सत्ता, त्यात ठाकरे कुटुंबातील व्यक्ती – तीही खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री- यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याला वेगळंच महत्त्व आहे. पण अद्याप पक्षामध्ये दसरा मेळाव्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. कोरोनाची परिस्थिती पाहता दसरा मेळावा होण्याची शक्यता कमी आहे. परंतु त्याबाबत कालांतराने निर्णय होईल. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करू शकतात, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER