केरळ विमान दुर्घटना: वैमानिक आणि सह-वैमानिकांसह 18 जणांचा मृत्यू

Kozhikode International Airport - Air India Plane Crash

मुंबई : दुबईहून(Dubai) १९१ प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे(Air India Express) विमान केरळमधील कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर(Kozhikode International Airport) उतरताना धावपट्टीवरून घसरल्याने शुक्रवारी रात्री मोठा अपघात घडला . हा अपघात इतका भीषण होता की विमानाचे दोन भाग झाले. ज्यामध्ये वैमानिक आणि सह-वैमानिकांसह 18 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे .

दोन्ही वैमानिकांनी दुर्घटना टाळण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु विमान अपघातातून वाचू शकले नाही. दीपक साठे (59) आणि कॅप्टन अखिलेश कुमार (३३) या दोघांनी ही अपघातात प्राण गमावला. हे दोघेही देशातील उत्कृष्ट वैमानिक होते.

दीपक साठे हे भारतीय वायुसेना (आयएएफ) चे माजी विंग कमांडर होते आणि त्यांनी हवाई दलाच्या उड्डाण चाचणी आस्थापनामध्ये काम केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER