डीएसके घोटाळा : मकरंद कुलकर्णी यांना अटक

DSK scam

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपात अटकेत असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ‘डीएसके’ दीपक सखाराम कुलकर्णी यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांना मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. ते अमेरिकेत पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप आहे.


पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपात अटकेत असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ‘डीएसके’ ऊर्फ दीपक सखाराम कुलकर्णी यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांना मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. ते अमेरिकेत पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप आहे. मकरंद कुलकर्णी हे डीएसकेमध्ये प्रवर्तक आहेत. कुलकर्णी बंधूंवर अडीच हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची किमान २३० कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

पोलीस बऱ्याच दिवसांपासून मकरंद यांचा शोध घेत होते. ते बेपत्ता असल्याने त्यांच्याविरुद्ध ‘लुकआऊट नोटीस’ काढण्यात आली होती. आज पहाटे मकरंद अमेरिकेला जात असताना त्यांना पकडण्यात आले. पुणे पोलिसांचे पथक त्यांना घेऊन जाण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहे.

ही बातमी पण वाचा : सावत्र वडिलांनी केलेल्या छळाविषयी अभिनेत्री श्वेता तिवारीच्या मुलीची भावनिक पोस्ट!