औरंगाबाद: दारुड्याचा पोलिस ठाण्यात गोंधळ

drunkered-chaos at Aurangabad police station

औरंगाबाद : दारुच्या नशेत गुन्हा दाखल करा असे म्हणत शेख शकील शेख लाल (वय ४५, रा.इंदीरानगर गारखेडा) या मद्यपीने जवाहरनगर पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याची घटना मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. शेख शकील याला संग्रामनगर उड्डाणपुलाखाली तीन जणांनी मारहाण केल्यामुळे तो पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आला होता. परंतु पोलिस तक्रार घेत नसल्याचे पाहुन त्याने गोंधळ घालून पोलिस ठाण्याच्या काचेवर डोके आपटून घेत डोके फोडून घेतले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक श्रध्दा वायदंडे करत आहेत.