‘ड्रग्ज’ तीन बडे अभिनेते एनसीबीच्या रडारवर

NCB

मुंबई : अभिनेता सुशांत सिंहच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान उघड झालेल्या ‘ड्रग्ज कनेक्शन’च्या चौकशीच्या फेऱ्यात बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींची नावं समोर आली. एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो) या प्रकरणाचा तपास करत असून त्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रित सिंह सारख्या बड्या अभिनेत्रींची नाने उघड झाली. आता काही मोठ्या अभिनेत्यांचीही नाव उघड होत आहेत. एनसीबी लवकरच त्यांच्यावरही कारवाई करण्याची शक्यता आहे .

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तीन बडे अभिनेते एनसीबीच्या रडारवर आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु असताना एनसीबीच्या जवळपास १५ पेक्षा जास्त अधिकाऱ्यांना कोराना झाला. पुढील तपासासाठी बाहेरुन टीम बोलावण्यात आल्या आहेत.

एनसीबी रडारवरील या अभिनेत्यांना केव्हा समन्स पाठवणार हे महत्त्वाचे आहे. हे अॅक्टर या अभिनेत्रींसोबत पार्टीत सहभागी झाले होते. या पार्टीत ड्रग्ज सेवन केल्याचे पुरावे हाती लागले तर एनसीबी या अभिनेत्यांना देखील समन्स पाठवेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER