‘ड्रग्ज’ चित्रपट निर्माता फिरोज नाडियादवालाच्या पत्नीला दोघांसह अटक

Firoz Nadiwala

मुंबई : एनसीबीने आज ‘वेलकम’, ‘फिर हेरा फेरी’, ‘आवारा पागल दीवाना’, ‘आन: मॅन अॅट वर्क’, ‘फूल अँड फायनल’ सिनेमांचे निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या घरी आणि कार्यालयात धाड ठाकली व ड्रग्ज प्रकरणी त्यांची पत्नी शबाना सईद हिला अटक केली. (NCB conducts raids at Firoz Nadiadwala’s Mumbai home)

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडच ड्रग्ज कनेक्शन गंजून राहिले आहे. एनसीबीने ठिकठिकाणी धाडी मारण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळपासूनच एनसीबीने काही ठिकाणी धाडी टाकल्या. मुंबईत मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर, कोपरखैरनेसह काही भागात ड्रग्ज पेडलर्सच्या अड्डयांवर धाड मारली. पाच ड्रग्ज पेडलर्सना अटक केली आहे. त्यातील एकाने फिरोज नाडियादवाला यांचे नाव घेतल्याने त्यांच्याही घरी आणि कार्यालयात धाड मारण्यात आली.

नाडियादवाला यांच्या घरातून ड्रग्ज जप्त केल्याची माहिती आहे पण त्याला एनसीबीकडून दुजोरा देण्यात आला नाही. नाडियादवाला यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या पत्नीचीही चौकशी सुरू असल्याचे कळते.

दरम्यान, बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड ग्रॅबिएला डेमोट्रियड्सच्या भावाला अटक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्याला काही अटींवर जामीन देण्यात आला होता. त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER