ड्रग्ज : भारती आणि हर्ष लिंबाचियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Harsh & Bharti In Judical Custody

मुंबई : कॉमेडियन भारती (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachia) यांना मुंबईच्या किल्ला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांचा जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोघांनीही अर्ज केलेला आहे. या अर्जावर उद्या (सोमवारी) सुनावणी होणार आहे. भारती आणि हर्ष यांच्यासोबतच इतर दोन ड्रग्ज पेडलर्सनाही कोर्टासमोर हजर करण्यात आले.  त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भारतीच्या घरात ८६.५ ग्रॅम गांजा सापडल्यानंतर दोघांनाही प्रथम एनसीबीने ताब्यात घेतले.

चौकशीनंतर भारती सिंह हिला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी एका ड्रग पॅडलरला पकडण्यात आले. आज भारती आणि हर्षच्या घरावर धाड टाकण्यात आली. ८६.५ ग्रॅम गांजा सापडला. नंतर दोघांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आले. भारती आणि हर्ष यांनी गांजा घेत असल्याचे कबूल केले. भारती आणि हर्ष या दोघांचीही स्वतंत्र खोल्यांमध्ये चौकशी करण्यात आली. भारतीने गांजा सेवन केल्याची कबुली दिली.

हर्षही सोबत एकत्र गांजा सेवन करायचा. भारती सिंह ही स्टॅण्डअप कॉमेडियन आणि अभिनेत्री आहे. सध्या ती ‘द कपिल शर्मा शो’मध्ये काम करत आहे. तिने २०१७ मध्ये लेखक हर्ष लिंबचियासोबत लग्न केले. तिने कारकीर्दीची सुरुवात ‘इंडियन लाफ्टर चॅलेन्ज’मधून केली होती.

दरम्यान, बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीपासून याची सुरुवात झाली आणि त्यानंतर दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, अर्जुन रामपाल, त्याची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांच्यासह अनेक नावं समोर आली आणि त्यांची चौकशीही झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER