बॉलिवूड पार्ट्यांत ट्रेमध्ये पुरवले जाते ड्रग्ज

Drugs - Bollywood Parties

सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. नारकोटिक्स ब्यूरोने (NCB) मुंबईत केजे आणि राहिल अशा दोन ड्रग्ज पेडलर्सना अटक केली असून या दोघांनी बॉलिवूडमध्येच नव्हे तर राजकारणी, व्यावसायिकांनाही ड्रग्ज पुरवत असल्याचे सांगितले आहे. यामुळे सर्वच क्षेत्रांत खळबळ माजली आहे. बॉलिवूडमध्ये ड्रग्जच्या वापराबाबत कंगनाने (Kangana Ranaut) वक्तव्य केले आणि आता जवळपास सगळेच कलाकार बॉलिवूडमधील ड्रग्जबाबत बोलू लागले आहेत. आता प्रख्यात दिग्दर्शक विक्रम भट्ट (Vikram Bhatt) यांनीही बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये ड्रग्स पुरवठा होत असल्याचे सांगितले आहे.

विक्रम भट्ट यांनी सांगितले की, बॉलिवूडमधील अनेक कलाकार ड्रग्ज घेत असल्याचे मी ऐकून आहे. बॉलिवूडमध्ये ड्रग्ज मोठी गोष्ट नाही. आणि बॉलिवूडमधील लोक ड्रग्ज घेत नाहीत असेही मी म्हणणार नाही. परंतु कधी पाहिलेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी बॉलिवूडच्या पार्ट्यांना जात आलो आहे. नेहमीच्या पार्ट्यांव्यतिरिक्त खास ड्रग्जच्या पार्ट्याही आयोजित केल्या जातात हे मला ऐकून माहिती आहे. अशा पार्ट्यांना मोठे मोठे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक हजेरी लावतात. पार्टीमध्ये ज्या प्रकारे खाण्याचे पदार्थ एका ट्रेमध्ये ठेवून सर्व्ह केले जातात, तसेच ड्रग्जचे विविध प्रकार एका ट्रेमध्ये सजवून सर्व्ह केले जातात आणि ज्याला जे ड्रग्ज हवे ते तो घेतो आणि त्याचा वापर करतो. अनेकांकडून मी अशा पार्ट्यांबाबत ऐकले आहे; पण मी अशा पार्ट्यांना आजवर कधीही गेलेलो नाही, असेही विक्रम भट्ट यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER