एनसीबीचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्या टीमवर ड्रग्ज पेडलर्सचा हल्ला

Sameer Wankhede

मुंबई : एनसीबीचे तपास अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर गोरेगाव येथे ड्रग्ज पेडलर्सने काल संध्याकाळी हल्ला केला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे असे वृत्त एएनआयने दिले.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन उघड झाले. चौकशीनंतर एनसीबीचे समीर वानखेडे यांनी अनेक तारे-तारकांवर कारवाई केली. समीर हे एनसीबीचे विभागीय संचालक आहेत. बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन त्यांनी उघड केले आहे. त्यांच्यासह त्यांच्या टीमवर हल्ला झाला आहे.

समीर कैरी मेंडिस नावाच्या आरोपीला पकडण्यासाठी गेले होते त्याला पकडताना हा हल्ला झाला. एकूण पाच लोकांची टीम या कारवाईसाठी गेली होती. कैरी मेंडिसला पकडून एनसीबी ऑफिसला आणण्यात आले आहे. या हल्ला प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.

एनसीबीने परवाच कॉमेडियन भारती सिंहला ड्रग्ज प्रकरणात अटक केली. त्यानंतर तिचा पती हर्ष लिम्बचिया याचीही चौकशी केली. त्याआधी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची लिव्ह इन पार्टनर यांचीही चौकशी केली होती. ड्रग्ज प्रकरणात आधी रिया चक्रवर्तीला अटक झाली. त्यानंतर बॉलिवूडच्या अनेक लोकांची नावे उघड झाली आहेत. दीपिका पदुकोण, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, दीपिकाची मॅनेजर, श्रुती मोदी, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर या सगळ्यांची चौकशी झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER