दुष्काळ : ऑस्ट्रेलियात १० हजार उंट मारले

Camels

मेलबर्न :- ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेली भीषण आग अजूनही विझलेली नाही. तिथे पाण्याचा दुष्काळ आहे. या दुष्काळाचे पहिले बळी ठरले आहेत तिथले उंट. उंट जास्त पाणी पितात म्हणून १० हजार उंटांना गोळ्या घालून मारले.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हे उंट मानवी वस्तीत येऊन पाण्याचा साठा संपवत असल्याची तक्रार लोकांनी केली होती. यावर कारवाई करत प्रशासनाने उंटांना मारण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी व्यावसायिक शिकाऱ्यांची मदत घेतली. त्यांनी हेलिकॉफ्टरमधून उंटांची शिकार केली. ऑस्ट्रेलियात गेल्या काही दिवसांपासून प्राण्यांना वाचवण्याची मोहीम सुरू करण्यात आली असताना उंटांना मारण्याचे वृत्त पसरताच प्राणिप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या भीषण आगीतून सुमारे ९० हजार प्राण्यांना प्राणिप्रेमी आयर्वीन कुटुंबाने वाचवले आहे. या कुटुंबाने या जखमी प्राण्यांना रुग्णालयात दाखल केले. आयर्वीन कुटुंबीयांप्रमाणे इतरही अनेक नागरिकांनी प्राण्यांचे जीव वाचवण्यात मदत केली आहे.