ब्राझीलमधील दुष्काळ भारतातील साखर उद्योगाच्या पथ्यावर

Sugarcane

पुणे : थायलंडमध्ये (Thailand) आणि युरोपीय (Europe) राष्ट्रांमध्ये उसाच्या (Sugarcane) उत्पादनात घट झाली आहे, तर गेल्या वर्षी ब्राझीलमध्ये दुष्काळ पडल्यामुळे या हंगामात साखरेच्या उत्पादनात घट अपेक्षित आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत साखरेचे उत्पादन 100 लाख टनांनी कमी पडण्याची शक्यता आहे. मागणीचा हा तुटवडा पूर्ण करण्याची क्षमता भारतीय साखर उद्योगामध्ये असल्यामुळे साखर उद्योगाला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे.

ब्राझील (Brazil), भारत (India), थायलंड, आस्ट्रेलिया (Australia) हे जागतिक बाजारपेठेत चार मोठे साखर उत्पादक देश आहेत. थायलंडमध्ये उसाचे उत्पादन घटले आहे. त्याचप्रमाणे युरोपीय राष्ट्रांमध्येही उसाच्या उत्पादनाची घट दिसून आलेली आहे. शिवाय ब्राझीलमध्ये गेल्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे साखरेच्या उत्पादनात घट अपेक्षित आहे. ब्राझीलमध्ये जास्तीत जास्त उसाचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी केला जातो. भारतात देशांतर्गत वापरासाठी २६५ लाख मेट्रिक टन साखरेची गरज असते. या हंगामात ३२५ लाख मे. टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात ६० लाख मे.टन साखरेचे मागणीच्या तुलनेत अतिरिक्त उत्पादन होण्याची शक्यता आहे. या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने ६० लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्यासाठी साखर कारखान्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

इंडोनेशिया हा जगातील साखर निर्यात करणारा सर्वांत मोठा देश आहे. त्या देशात १३ शुगर रिफायनरीज असून, या रिफायनरीजना कच्च्या साखरेची गरज असते. इंडोनेशियाला यावेळी ३० लाख मेट्रिक टन साखरेची गरज आहे. उच्च गुणवत्ता आणि वाहतुकीचा कमी खर्च यामुळे इंडोनेशिया भारताकडून साखर खरेदी करण्याच्या तयारीत आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेची किंमत २ हजार ७०० रुपये प्रतिक्विटल आहे. प्रतिटन सहा हजार रुपये केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना प्रतिक्विटल ३ हजार ३०० रुपये दर मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER