वृक्षारोपणावर आता ड्रोन ची नजर

नागपूर: राज्यातील अनेक झाडं कुठल्या न कुठल्या कारणास्तव तोडण्यात येतात. त्यामुळे राज्यातील झाडांची संख्या अतिशय कमी झाली असून ही चिंताजनक बाब आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यात वृक्षारोपण करण्याचे ठरवण्यात आले आहे. ही वृक्षारोपणाची मोहीम १ जुलैपासून सुरु करण्यात येणार असून या मोहिमेवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक वन परिक्षेत व स्थळांवर फिरून कोणत्या प्रजातीची व किती झाले लावण्यात आली, ही सर्व माहिती गोळा करून ड्रोन त्याचा व्हिडियो तयार करणार आहे. हा व्हिडियो फोटोसह ऑनलाईन उपलोड देखील करण्यात येणार आहे.

आतापर्यंत ऑनलाईन वृक्षारोपणाचे केवळ आकडेच मिळत असत. पण यावर्षीपासून वृक्षारोपणाच्या आकड्यांसहित वृक्षारोपण केलेल्या स्थळाचे चित्रीकरण देखील उपलब्ध होणार आहे. यंदा ड्रोनद्वारे पहिल्यांदाच चित्रीकरण करण्यात येणार असल्याने वन अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकतेबरोबरच चिंतेच वातावरणही आहे. या मोहिमेकरीता प्रत्येक वनवृत्तेमध्ये मुख्य वनसंरक्षक स्तरावर आवश्यकतेनुसार ड्रोन किरायाने घेण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.