राज्यातील कारागृहांवर ‘ड्रोन’ची करडी नजर : कारागृह महानिरीक्षक रामानंद

Ramanand.jpg

कोल्हापूर : राज्यात सर्वच मध्यवर्ती व जिल्हा कारागृहातील गैरप्रकार रोखण्यासाठी किंबहुना दैनंदिन हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन यंत्रणा लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे, असे अप्पर पोलिस महासंचालक (Upper Director General of Police) (कारागृह) सुनील रामानंद (Sunil Ramanand) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कळंबा कारागृहात मोबाईल, गांजासह अमली पदार्थाचा साठा पुरविण्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. या घटनेची दखल घेत रामानंद कोल्हापुरात आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कळंबा कारागृहातील घटना गंभीर आहे. गृहमंत्रालयाने त्याची दखल घेत चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. वरिष्ठपातळीवर चौकशी करून कठोर कारवाई होईल. कळंबा कारागृहात दोन वर्षांत अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. या सर्व अधिकाऱ्यांमार्फत चौकशी प्रकारांची उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत विभागीय चौकशी सुरू आहे. राज्यातील सर्वच मध्यवर्ती कारागृहासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे गैरप्रकार टळतील. शिवाय अत्याधुनिक पद्धतीची सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. त्यासाठी ९६ कोरटींचा निधीही मंजूर झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER