गोमूत्र अर्क प्यायल्याने होतो फुफ्फुसांतील संसर्ग दूर; भोपाळच्या खासदारांचा अजब दावा

Bhopal MP Sadhvi Pragya Singh Thakur

मुंबई : आपल्या वक्तव्यांनी नवनवे वाद सुरू करून देण्याची भाजप (BJP) नेत्यांची परंपरा सुरू आहे. भान न ठेवता सार्वजनिकपणे वक्तव्य करून वाद निर्माण करणारे अनेक नेते भाजपमध्ये आहेत. यापैकी एक भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) आहेत. त्यांनी आता एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.

ही बातमी पण वाचा:- सीबीआयने तृणमूलच्या नेत्यांना चौकशीसाठी घेतले ताब्यात; ममताही पोहोचल्या!

“कोरोना महामारीच्या (Corona Crises) प्रकोपात सगळ्यांनीच खूप सावध रहायला हवे. सरकारने घालून दिलेल्या कोरोनासंबंधी नियमांचे सर्वांनी पालन करायला हवे. जगभरातले शास्रज्ञ कोरोनावरील लस आणि विषाणूच्या नवनवीन उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या वेगवेगळ्या व्हिडिओंमधून आयुर्वेदिक उपचार सुचवले जात आहेत. गोमूत्र अर्क प्यायल्याने फुफ्फुसांतील संसर्ग दूर होतो. मी रोज गोमूत्र अर्क पिते त्यामुळे मला कोरोना झालेला नाही. प्रत्येकाने देशी गाय पाळली पाहिजे आणि गोमूत्र प्यायला पाहिजे.” असे मत प्रज्ञासिंह यांनी व्यक्त केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button