ताडी प्या, कोरोना टाळा! बसपाच्या नेत्याचा सल्ला

Tadi

बलिया : मायावती यांच्या बहुजन समाजवादी पार्टी (बसपा) चे प्रमुख नेते भीम राजभार यांनी दावा केला आहे की, ताडी प्याल्याने कोरोना होत नाही!

बलियामधील रासरा येथे सोमवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना ताडीचे महत्त्व सांगताना ते म्हणालेत, आमच्या (राजभार) समाजात ताडीला गंगेच्या पाण्यापेक्षाही पवित्र मानतात. ताडीत रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुण आहेत. ताडी प्यायल्याने करोना होत नाही. आमच्या समाजात अनेकजण भरपूर ताडी पितात. त्यामुळे त्यांना करोनाचा संसर्ग होत नाही! राजभार समाजात लहान मुलांनाही ताडी पाजतात, अशी माहिती त्यांनी दिली.

मात्र, भीम राजभार यांनी केलेल्या दाव्याला कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाहीय. ताडीमुळे करोनाचा संसर्ग होत नाही यासंदर्भात पुरव्यासह दावा करता येणार अभ्यास अद्याप कोठेही झालेला नाही. त्यामुळे राजभार यांच्या दाव्याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER