तंग कपडे घातले; महिला खासदाराला काढले संसदेतून बाहेर

Maharashtra Today

टांझानियाच्या संसदेत (Tanzanian Parliament) तंग कपडे घालीन आलेल्या एका महिला खासदाराला सभापती जॉब डुगाई संसदेतून बाहेर काढले. इतर महिला खासदारांनी या निर्णयाचा विरोध केला आहे.

खासदार कॉन्डेटर मिशल (Michael Sichlwe) या संसदेत ट्राऊजर घालून आल्या होत्या. मंगळवारी संसदेचे सभापती जॉब डुगाई (Job Dugai) यांनी त्यांच्या कपड्यांवर आक्षेप घेतला.

डुगाई त्यांना म्हणालेत, तुम्ही संसदेच्या योग्य असे कपडे परिधान केलेले नाहीत. बाहेर जा व योग्य कपडे घातल्यानंतरच संसदेत या! यांच्याआधी हुसैन अमर नावाच्या एका खासदारानेही काही महिलांच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. काही भगिनी विचित्र कपडे घालून संसदेत येतात, असे विधान त्यांनी केले होते, हे उल्लेखनीय.

डुगाई यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले असून महिलांच्या कपड्यांवरून अनेक तक्रारी येत आहेत, असे सांगितले. अनेक महिला खासदारांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. अशाप्रकारे महिलांना अपमानित करण्याची कृती अतिशय निंदनीय असून त्यासाठी मिशल यांची माफी मागावी, अशी मागणी या महिला खासदारांनी केली आहे.


Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button