सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड; जीन्स, टी-शर्टला बंदी

Jeans T-shirt banned govt Employess

मुंबई :  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ( Govt Employees) ड्रेस कोड (Dress Code) लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश राज्य सरकारने जाहीर केले आहेत. बरेच अधिकारी- कर्मचारी कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांना अनुरूप वेशभूषेचा वापर करीत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होते, असे सरकारचे म्हणणे आहे.

शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून चांगल्या वागणुकीची तसेच व्यक्तिमत्त्वाची  अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येते. अधिकारी- कर्मचारी यांची वेशभूषा अशोभनीय, गबाळी व अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्याच्या एकंदरीत कामकाजावरही होतो. हे लक्षात घेऊन मंत्रालय तसेच सर्व राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कसा असावा याबाबत पुढील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत–

१) गडद रंगांचे चित्रविचित्र नक्षीकाम/चित्र असलेले पेहराव परिधान करू नयेत. तसेच सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीन्स, टी-शर्टचा वापर कार्यालयात करू नये.

२) खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा (शुक्रवारी) खादीचे कपडे वापरावेत.

३) महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा तसेच पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बूट (शूज), सॅन्डल वापराव्यात.

४) कार्यालयामध्ये स्लिपरचा वापरू नये.
५) सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कपडे व्यवस्थित असावे. महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात साडी, सलवार/चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पँट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा वापरावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर पॅन्ट असा पेहराव करावा.

६) कपडे स्वच्छ व नीटनेटके असावेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER