नाट्यसंगीत आणि बरंच काही…

Amey Wagh

आपले मराठी कलाकार हे नेहमीच त्यांच्या विविध कलाकौशल्यामुळे ओळखले जातात, असं काहीसं अभिनेता फास्टर फेणे फेम अमेय वाघ (Amey Wagh) याचं आहे. प्रत्येक कलाकार हा त्याच्या सोशल मीडियावरून अनेक गोष्टी आपल्या फॅन्ससोबत शेअर करताना आपण नेहमी बघतो; पण अमेयचा काहीसा हटके अंदाज असतो. हे आपण त्याच्या सोशल मीडियावर नेहमी बघत असतो. अनेक कलाकारांनी लॉकडाऊन दरमान्य अनेक नव्या संकल्पना घेऊन काहीतरी सादर करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अमेयनेदेखील स्वतःच यू-ट्युब चॅनेल सुरू केलं आहे, तिकडे तो कमालीचा कन्टेन्ट पोस्ट करत असतो.

आजवर अमेयने अनेक उत्तम दर्जेदार चित्रपट , मालिका आणि वेब सीरिज केल्या आहेत. तो त्याच्या फॅन्ससोबत नेहमीच सोशल मीडियाद्वारे संवाद साधत असतो. सध्या सोशल मीडियावर त्याच्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे. नक्की काय आहे हा व्हिडीओ बघूया. अमेयने या व्हिडीओमध्ये आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते हे सांगताना हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तो सांगतो, “दिवसाची सुरुवात पं. अभिषेकी बुवांनी आणि सांगता पंडित वसंतरावांनी ! तुम्ही नाट्यसंगीतप्रेमी आहात का ? काय ऐकायला आवडतं ? ” असा सवाल त्याने आपल्या फॅन्सना केला आहे. अमेयने आजवर अनेक उत्तम नाटकात काम केलंय. त्याची नाट्यसंगीताची आवड या व्हिडीओमध्ये बघायला मिळते. हा लिपसिंग गाण्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अमेय वाघ याने या पोस्टमध्ये दिगग्ज शास्त्रीय गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचं नाट्यसंगीत ऐकवलं आहे. तर अशी आपल्या दिवसाची संगीतमय सुरुवात करतो असं त्यानं सांगितलं. फक्त लिपसिंग व्हिडीओ असला तरी अमेयची नाट्यसंगीताची आवड यात बघायला मिळते. अभिनयाच्या सोबतीने अमेयला अनेक छंद जोपासायला आवडतात. सोशल मीडिया स्टार तर तो आहेच; पण नेहमी अनेक ट्रेंडी गोष्टी करून तो त्याच्या फॅन्सना खूश करत असतो. अमेयने हा वेगळेपणा जपला आहे.

अमेय वाघ हा सोशली जेवढा ऍक्टिव्ह असतो तेवढाच तो घरच्या कामातदेखील ऍक्टिव्ह आहे. लॉकडाऊनमध्ये अगदी स्वयंपाकघराचा ताबा घेत अनेक प्रयोग त्याने केले होते. तो नेहमीच चर्चेत राहतो याचं कारण तो त्याच्या फोटोंना उत्तम कॅप्शन देतो. अमेय वाघ नेहमीच त्यांचा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह राहून प्रेक्षकांना खूश करतो आणि आता तो अनेक नव्या प्रोजेक्टमधून आपल्या भेटीला येणार आहे.

‘झोबिवली’ या आगामी चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे अमेय नक्कीच यात काहीतरी वेगळा रोल करणार आहे याची उत्सुकता सगळ्यांना आहे. अमेय वाघ आणि नाटक हे नातं अतूट आणि तेवढं खास आहे ते ‘नाटक कंपनी’मुळे. त्यानं आजवर अनेक दर्जेदार नाटकं केली आहेत. मराठीत उत्तम चित्रपट करून त्याने प्रेक्षकांना आपलंसं केलं. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरांत पोहचून आता अनेक तरुणाईच्या गळ्यातला ताईत तो बनला आहे.

‘पोपट’ , ‘फास्टर फेणे’ , ‘मुरांबा’ , ‘धुरळा’ , ‘गर्लफ्रेंड’ अशा धमाकेदार चित्रपटांत त्याने अभिनयाच्या जोरावर अनेक पुरस्कारदेखील पटकावले. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील त्यांचा रोल हा विशेष लक्षात राहणारा आहे. त्याचसोबतीने ‘कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण’ या शोचा होस्ट म्हणून अनेक कलाकारांची तो फिरकी घेऊन गमतीजमती करताना दिसतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER