
मुंबई: महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar )यांना अभिवादन केल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाबाबत मोठी घोषणा केली आहे. 14 एप्रिल 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण होईल, अशी घोषणा मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली आहे.
आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवरांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. त्यावेळी झालेल्या छोटेखानी समारोहात धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करु असं आश्वासन दिलं आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन केले.दरवर्षी येथे लाखो अनुयायी अभिवादन करायला येत असतात,कोरोनामुळे प्राप्त परिस्थितीत राज्य शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे आभार!
(1/2) pic.twitter.com/De8HFVZFTE— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 6, 2020
ही बातमी पण वाचा : डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचा वारसा जपण्यासाठी आम्ही वचनबद्ध; पवारांकडून अभिवादन
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला