ऑनलाईन अभ्यासक्रम तयार करणाऱ्या डॉ. राजेंद्र साळुंखे यांचा सन्मान

Rajendra Salunkhe

इंदापूर : शहरातील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे प्राध्यापक डॉ. राजेंद्र साळुंखे यांना उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुणे विद्यापीठामार्फत ॲानलाईन टीचिंगबाबत १२५ महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठाच्या ‘लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम’ या योजनेमधून विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट व प्रभावी ॲानलाईन मटेरिअल राजेंद्र साळुंखे यांनी तयार केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लॉकडाऊनच्या काळात सर्व शिक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या साहित्याचे ऑडिओ व व्हिडीओ क्लिप्स तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेला प्रतिसाद देत डॉ. राजेंद्र साळुंखे यांनी ऑनलाईनसाठी उत्कृष्ट अभ्यासक्रम तयार केले. यांची निवड विद्यापीठामार्फत अभ्यास निवड समितीने केली.

डॉ. साळुंखे यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, दिल्ली विद्यापीठ अनुदान आयोगाचे व्हाईस-चेअरमन डॉ. भूषण पटवर्धन, केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाचे सचिव डॉ. कोटेचा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच इंदापूर शहरवासीयांच्यावतीने सामजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक सौरभ शिंदे, दीपक झालटे -पाटील, प्रतीक शिंदे, रामचंद्र शिंदे व सोनाईनगरचे नागरिक आदींनी डॉ. राजेंद्र साळुंखे यांचा सन्मान केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER