डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचा वारसा जपण्यासाठी आम्ही वचनबद्ध; पवारांकडून अभिवादन

Sharad Pawar

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. babasaheb Ambedkar) यांचा आज (6 डिसेंबर) 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनीही चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले.

देशाच्या नवउभारणीसाठी समता आणि सामाजिक न्यायाचा पुरस्कार आणि सांविधानिक मूल्यांचा भक्कम गाभा देणारे प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा वारसा जपण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे म्हणत पवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER