एका जोशीयाने…😢

Shripad joshi

मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी राजीनामा दिल्याबद्दल काही लोक समाधान व्यक्त करीत असल्याचे पाहून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. यवतमाळ साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांच्या निमित्ताने गेले दोन-तीन दिवस देशभर मराठी भाषा, संस्क्रुती यांची ऐसीतैसी होत असताना, त्याबद्दल कोणतीही शिक्षा न होताच जोशी पदावरून दूर झाले, यात कसले आले समाधान? माझ्या माय मराठीच्या अब्रूची लक्तरे टांगली गेली, त्याची जबाबदारी कोण घेणार- स्वागताध्यक्ष मदन येरावार, आयोजन समितीचे कर्तेधर्ते डॉ. कोलते, मलकापुरे की आणखी कोणी? मराठीच्या इज्जतीचा देशव्यापी पंचनामा केल्याबद्दल आम्ही मराठीजनांनी आता कोणाला जाब विचारायचा, हा माझा सवाल आहे.

जोशींनी हिटलरशाही केली, असे आता सांगणारे मलकापुरे आणि त्यांचे सहकारी प्रत्येक घटना घडताना चूप का राहिले, सहगलबाईंना मुळात निमंत्रणच का जाऊ दिले गेले, नंतर माघार घेणे त्यांनी रोकले का नाही, असे अनेक प्रश्न जनसामान्यांना पडले आहेत. हिटलर तेव्हाच यशस्वी होतो, जेव्हा त्याच्या सभोवतालचे लोक लाचारीने त्याच्या हो शी हो मिळवतात! जोशी एवढा मोठा डाव खेळत असताना आयोजन समितीने त्यांना साथ दिली, याला काय म्हणायचे? ही चूक की मोठेपणा मिरवण्याच्या संधीची लाचारी? हाही प्रश्न लोकांना पडला आहे.

जोशी संघविरोधी डाव्या कळपातले असले तरी, स्वत: मात्र एकाधिकारशाहीचे भोक्ते आहेत, हे जगजाहीर आहे. म्हणूनच यंदा दिल्लीच्या संस्थेने यजमानपद नाकारले. ते स्वीकारताना यवतमाळकरांनी कासरे आपल्या हातात ठेवले असते, तर बैल बुजाडले नसते! याप्रकरणात संमेलनाचे काय व्हायचे ते होईल. पण, महाराष्ट्र सरकार, भाजपा, संघ परिवार यांची विनाकारण, त्यांचा संबंध नसताना बदनामी करण्यात आली आणि मराठीला मान खाली घालायला लावण्यात आली, त्याचे काय? याला जबाबदार कोण? फक्त जोशींकडे बोट दाखवून भागणार नाही! इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा… जोशी उजव्या रस्त्याने चालत सुद्धा नाहीत, एवढे डावे आहेत! त्यांनी योजनाबद्ध कट रचून आयोजन समितीला तोंडघशी पाडले आणि पुरोगाम्यांचा डावा अजेंडा यशस्वीरीत्या राबविला. यात ते एकटे सर्वांना भारी पडले, हे स्पष्टपणे जाणवते.

ही बातमी पण वाचा : यवतमाळ संमेलनाचा बुढीचा चिवडा…🤣

हा “विजय” साजरा करण्याऐवजी डावे-पुरोगामी आता जोशींना जबरदस्तीने उजव्यांच्या गोटात ढकलत आहेत. कारण, जोशींचे डावे असणे आज त्यांना फायद्याचे नाही! कटाचे खापर आपल्या माथी येऊ नये यासाठी जोशींच्या जातीचा आडोसा घेत त्यांना उजवे, सरकारचे हस्तक ठरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्यक्षात जोशींनी हा कट डाव्यांसाठीच आखला. कारण त्यांची सारी हयात डाव्या-पुरोगामी चळवळींमध्ये गेली आहे. मी अध्यक्ष नसतो तर बहिष्काराचे नेत्रुत्व केले असते, हे त्यांचे ताजे विधान त्यांच्या भक्कम डावेपणाचा आणि कटाचाही सबळ पुरावा आहे. हा कट असा-

१. सहगलला निमंत्रण देणे
२. सरकारविरोधी भाषणाची सूचना करणे
३. मनसेची धमकी (मँनेज केली का, याची चौकशी झाली पाहिजे. कारण राज ठाकरेंनी नेमका उलटा पवित्रा घेतला!)
४. धमकीच्या कारणाने निमंत्रण-माघार
५. अपेक्षित देशव्यापी गदारोळ
६. अध्यक्षपदाचा राजीनामा

हा सहा कलमी कार्यक्रम ठरल्याप्रमाणे राबला. धमकीच्या फुसक्या कारणावर कोणाचाही विश्वास बसला नाही. मधल्या काळात सहगलच्या न दिलेल्या भाषणाचे मराठी भाषांतर व्हायरल करून उपलब्ध करून देण्यात आले. (हाही कटाचाच भाग!) आणि असहिष्णू वातावरणाच्या नावाने देशभर बोम्ब ठोकण्यात आली! यवतमाळच्या आयोजकांच्या काही लक्षात यायच्या आत जोशी आँपरेशन पूर्ण करून रिंगणातून बाहेरही पडले! घेत बसा तुम्ही आता टोले!!

 

देशमुखी/विनोद देशमुख 9850587622