मराठा आरक्षणाच्या वाटेत काटे टाकण्याचा हा कुटिल डाव आहे; काँग्रेसची टीका

Dr Sanjay Lakhe Patil

मुंबई :- मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील (Dr. Sanjay Lakhe Patil) यांनी मोदी सरकारवर (Modi Govt) हल्लाबोल केला आहे. ‘मराठा आरक्षणाच्या नावाने राज्यभर आंदोलन करण्याचा भाजपचा निर्णय म्हणजे आरक्षणाच्या वाटेत काटे टाकण्याचा हा कुटिल डाव आहे.’ अशी टीका संजय लाखे-पाटील यांनी केली.

मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा अनाजीपंती ‘कात्रज’ दाखवण्याचा कावेबाज डाव असल्याची टीकाही संजय लाखे-पाटील यांनी केली आहे. आरक्षणप्रश्नी भाजप राजकारण करत आहे. एसईबीसी कायद्यातील त्रुटी, घटनात्मक अडथळे दूर करत मराठा आरक्षणाला न्याय मिळवून देण्याऐवजी आघाडी सरकारच्या विरोधात गावोगाव आंदोलन करून स्वत:च्या चुका झाकून ठेवण्याचा हा प्रकार आहे. विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्याची योजना आखतील आणि भाजप त्यांना रसद देण्याचा अजेंडा आहे, असे लाखे-पाटील म्हणाले.

मराठा समाजाला खरेच आरक्षण मिळावे अशी भाजपची भूमिका असेल तर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून राज्याचे अधिकार काढून घेणारी १०२ वी घटनादुरुस्ती तत्काळ रद्द करावी, कालबाह्य़ झालेल्या इंद्रा सहानी खटल्यातील ५० टक्के आरक्षणमर्यादेची अट काढून टाकावी, एसईबीसी कायद्याला संसदेच्या दोन्ही सभागृहांचे बहुमताने संरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन लाखे-पाटलांनी केले.

ही बातमी पण वाचा : आता दातखिळी बसली का? गोपीचंद पडळकरांना काँग्रेसचा सवाल 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button