डॉ. कलशेट्टी यांना मनपातर्फे निरोप : विनासुट्टी कलशेट्टी

Dr. Manpata's message to Kalshetti

कोल्हापूर : आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी हे २४ तास कामामध्ये असायचे. त्यांची ही ऊर्जा आम्हाला प्रेरणादायी आहे. त्यांनी शहरात सलग ७५ रविवारी स्वच्छता मोहीम राबविली. विनासुट्टी त्यांनी सलग काम केले. ‘कलशेट्टी विनासुट्टी’ महापालिका वर्तुळात म्हटले जात असे.

आज रविवारी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचा निरोप समारंभ आणि नूतन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांचे स्वागत करण्यात आले. डॉ.मल्लिनाथ यांनी पूरकालावधी व कोरोना कालावधीमध्ये महापालिकेच्या तिजोरीवर कोणताही बोजा पडू दिला नाही. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा नियोजन व सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांचे सहकार्य घेतले. त्यामुळे महापालिका या आपत्तीच्या कालावधीत कोठेही कमी पडली नाही. नूतन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनाही सहकार्य राहील, अशा भावना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या. कोल्हापूरचे नागरिक यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच मी माझ्या कार्यकाळात पारदर्शी लोकाभिमुख कामकाज केले आहे. आयुक्त म्हणून केलेल्या कामाबद्दल मी पूर्ण समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया मावळते आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी व्यक्त केली.

नूतन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, मला शहराचा विकास करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. जसे मावळते आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांना आपण सर्वांनी सहकार्य केले तसेच मलाही सहकार्य करावे. अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे शहराच्या दृष्टीने काही नवीन संकल्पना असतील तर मला न डगमगता सांगा. महानगरपालिका सर्व क्षेत्रांमध्ये नंबर वन यावी यासाठी मला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. आपण सर्वजण मिळून चांगले काम करू. डॉ. कलशेट्टी यांनी जे उपक्रम हाती घेतलेले आहेत ते सर्व उपक्रम पुढे चालू राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER