डॉ. अग्रवाल देऊन गेले संदेश – “मी या जगात असेन किंवा नसेन…”

दिल्ली :-इंडियन मेडिकल असोसिएशनचे (Indian Medical Association) माजी अध्यक्ष आणि हार्ट केअर फाउंडेशनचे प्रमुख पद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल (Dr.k.k. Agarwal) यांचे सोमवारी रात्री साडेअकरा वाजता निधन झाले. त्यांनी संदेश रेकार्ड करून ठेवला होता – “मी या जगात असेन किंवा नसेन, द शो मस्ट गो ऑन.” डॉ. अग्रवाल कोरोनातून बरे होऊन पहिल्यांदा हॉस्पिटलमधून बाहेर आले होते. त्यांच्या नाकात ऑक्सिजनचा पाईप होता. तशा अवस्थेत त्यांनी संदेश रेकार्ड केला. व्हिडीओत म्हणाले होते – “मी या जगात असेन वा नसेन, द शो मस्ट गो ऑन.” त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) नेटीजन्स डॉ. अग्रवाल यांची प्रशंसा करत आहेत.

अग्रवाल यांना दुसऱ्यांदा कोरोना (Corona) झाला होता. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्समधील ट्रामा सेंटर येथे उपचार सुरू होते. तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. अग्रवाल यांनी दोन महिन्यांपूर्वीच कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. पण, गेल्याच महिन्यात त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला. डॉ. अग्रवाल गोरगरीब रुग्णांना निःशुल्क सेवा देणे आणि दिलदारपणामुळे ओळखले जात होते. कोरोनाकाळात ते डॉक्टरांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले होते. सन २०१० मध्ये अग्रवाल यांना सामाजिक बांधिलकीसाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला होता.


हार्ट केअर फाउंडेशनने घेतला निर्णय

डॉ. अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे सामाजिक काम पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘हार्ट केअर फाउंडेशन ऑफ इंडिया’ने डॉ. अग्रवाल यांच्या नावे डॉ. के. के. रीसर्च फंडद्वारे निःशुल्क ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही ओपीडी रोज सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सुरू राहील. यामध्ये देशभरातील रुग्ण ऑनलाईन आजारावरील सल्ले घेऊ शकतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डॉ. अग्रवाल यांनी रुग्णांना ऑनलाईन मदत केली होती. सोशल मीडियावरून कोरोनाबाबत जनजागृती करत होते.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button