डॉ. हेडगेवार तुरूंगातून सुटले आणि स्वागतासाठी उपस्थित होते मोतीलाल नेहरू !

Maharashtra Today

भारतात स्वातंत्र्य लढा तीव्र होत होता. ब्रिटाशांची गुलामी नाकारून स्वराज्याची मागणी सुरु होती. देश क्रांतीच्या विचाराने भारावून गेला होता. लहानमुलापासून जेष्ठांपर्यंत सर्वच क्रांतीसाठी प्रयत्न करत होते. अशातच नागपूरच्या हायस्कुलला ब्रिटीश अधिकारी भेट देणार होते. मोठी तयारी करण्यात आली होती. अधिकाऱ्याचं आगमन झालं. आणि एक शालेय विद्यार्थी वंदे मातेरमच्या घोषणा देऊ लागला. त्याला शाळेतून काढून टाकण्यात आलं. क्रांतीच ते बीज आता यवतमाळमध्ये रुजणार होतं. त्या विद्यार्थ्यांनं पुढं जाऊन अशा संघटनाचा पाया रोवला जे जगातलं सर्वात मोठं संघटन म्हणून आज ओळखलं जातं. या संघटनेचनं नाव आहे ‘राष्ट्रीय स्वयं सेवक संघ.'(RSS) आणि संस्थापक होते केशव हेडगेवार (Keshav Hedgewar)!

लहानपणापासूनच क्रांतीकारी स्वभावच्या हेडगेवारांनी काही काळ काँग्रेसमध्येही काम केलं होतं. त्यांचा जन्म नागपूरचा. लहानपणापासून त्यांना संघर्षाला तोंड द्यावं लागलं. वयाच्या १३ व्या वर्षी आई आणि वडील दोघांचे छत्र त्याच्या डोक्यावरुन हरपलं. वडील बळीराम हेडगेवार आणि आई रेवती यांचा प्लेगनं बळी घेतला होता.

नील सिटी हायस्कूल नागपूर इथं शिकायला असताना ब्रिटीश अधिकाऱ्यासमोर ‘वंदे मातरम्’ ही घोषणा दिल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. इथून निघून ते यवमाळला शिकायला गेले. पुढं त्यांनी १२ वी पर्यंतच शिक्षण पुण्यात घेतलं. डॉक्टरीचं शिक्षण घेण्यासाठी हिंदू महासभेचे अध्यक्ष बी. एस. मुंजे यांनी १९१० ला हेडगेवारांना कलकत्त्याला पाठवलं. तिथं राष्ट्रीय मेडीकल कॉलेजात ते एल.एम.एस परीक्षा पास झाले. १९१४ पासून त्यांनी डॉक्टरकीचं प्रशिक्षण घेतलं आणि १९१५ ला ते डॉक्टर बनून नागपूरला परतले.

देशकार्यात सहभाग

हेडगेवार वैद्यकीय शिक्षण घ्यायला जेव्हापासून कोलकत्याला गेले होते, तेंव्हा ते अनुशीलन समितीशी जोडले गेले. १९१५ ला नागपूरला परतल्यानंतर ते काँग्रेसमध्ये सक्रीय झाले. त्यांना विदर्भ प्रांतीय काँग्रेसची जबाबदारी देण्यात आली होती. १९२० च्या काँग्रेसच्या राष्ट्र स्तरीय अधिवेशनात पहिल्यांदा पुर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती. १९२१ साली त्यांनी पहिल्यांदा असहकार चळवळीत सहभाग नोंदवला. यात त्यांना अटकही झाली होती.

हेडगेवार यांच्या सुटकेनंतर नागपूरात मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मोतीलाल नेहरू आणि हकिम अजमल खान यांच्यासारखे दिग्गज मंडळींनी संबोधित केलं होतं.

संघाची स्थापना

२८ सप्टेंबर १९२५ ला संघाची स्थापना झाली. यानंतर देखील त्यांचा काँग्रेस आणि क्रांतीकाऱ्यांच्या प्रति सकारात्मक दृष्टीकोन होता. डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे, पंराजपे आणि बापूसाहेब सोनी यांच्या सोबत मिळून त्यांनी हिंदू युवक क्लबची स्थापना केली. पुढं जाऊन ही संघटना ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ यानावानं ओळखली गेली.

१९२९ ला जेव्हा लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी केली तेव्हा संघानं संपूर्ण देशभर तिरंगा फडकवण्याचं आवाहन केलं होतं. ३० जानेवारीला झेंडा फडकवून त्यांनी संपूर्ण स्वराज्याची मागणी केली. १९१६ मध्ये काँग्रेस अधिवेशनात लखनऊमध्ये काँग्रेसशी झालेल्या मतभेदानंतर त्यांनी नागपूरात ‘आर.एस.एस’ची स्थापना केली होती.

हैद्राबादच्या निझामाविरुद्ध मोर्चा

१९३८ साली आर्य समाजानं हैद्राबादच्या निझामाविरुद्ध लढा पुकारला. निझामच्या जुलमी राजवटीला उलथून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गांधींनी आर्य समाजाला आंदोलन न करण्याचा सल्ला दिला तर सावरकरांनी हिंदू महासभेचा पाठिंबा आर्य समाजाला जाहीर केला.

२५ हजार आंदोलनकर्त्यांनी निझामाविरुद्ध आंदोलन छेडलं. निझामचे सैनिक आणि आंदोलनकर्ते भिडले. आंदोलकांना तुरुंगात टाकून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले यात १२ हजार हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते. आर.एस.एस. ला त्याकाळात हिंदू महासभेचीच युवा शाखा मानलं जायचं.

निधन

हेगडेवारांनी १९२५ ते १९४० पर्यंत संघाचं सरसंघचालक पद स्वीकारलं. नागपूरात २१ जून १९४० साली त्यांच निधन झालं. नागपूरच्या रेशीमबागेत त्यांची समाधी आहे.