अमरावतीचे डॉ. संदेश गुल्हाने पहिले स्कॉटिश खासदार

Dr Sandesh Gulhane MSP - Maharashtra Today

अमरावती : मूळचे अमरावतीचे व सध्या स्कॉटलँड येथे वैद्यकीय असलेले डॉ. संदेश प्रकाश गुल्हाने यांनी नुकतीच स्कॉटिश संसदेचे खासदार म्हणून शपथ घेतली. स्कॉटिश संसदेत निवडून जाणारे ते भारतीय वंशाचे पहिलेच खासदार आहेत.

अमरावती येथील भाजी बाजार परिसरातील रहिवासी प्रकाश गुल्हाने यांना सहा बहिणी आहेत. एक बहीण इंजिनीअरिंग झाल्यावर प्रकाश यांना लंडनला घेऊन गेली. १९७५ साली लंडन येथे संदेश यांच्या वडिलांना एक खाजगी नोकरी मिळाली. प्रकाश यांनी लंडनमध्येच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. लग्न केले.  त्यांचा एकुलता एक मुलगा संदेश यांचाही जन्म लंडनमध्येच झाला. डॉक्टर संदेश गुल्हाने यांनी पूर्व किल्ब्राईडमधील रुग्णालयात ऑर्थोपेडिक रजिस्ट्रार म्हणून काम सुरू केले. वैद्यकीय सेवेसोबतच त्यांनी विविध क्षेत्रात कार्य करत स्कॉटिश राजकारणात प्रवेश केला.

२०२१ मध्ये डॉ. संदेश यांना ग्लासगो पोलॉक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. स्कॉटिश कन्झर्व्हेटिव्ह आणि युनियनवादी पार्टीकडून डॉ. संदेश खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी संसदेत खासदार म्हणून नुकतीच शपथ घेतली.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button