डॉ. अभिनव देशमुख फ्रन्ट रनर : सतेज पाटील

Dr. Abhinav Deshmukh - Satej Patil

कोल्हापूर : कोल्हापूरचे (Kolhapur) तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Dr. Abhinav Deshmukh) हे फ्रन्ट रनर आहेत. कोरोना (Corona) महामारीच्या काळात त्यांची उत्कृष्ट सेवा बजावली. असे अधिकारी पोलीस दलाची शान आहेत, असे गौरवउध्दगार पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी काढले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रमुख उपस्थितीत जिल्हापरिषदेतर्फे आयोजित माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी ते बोलत होते.

राजकारण आणि प्रशासन हातात हात घालून काय जनतेला उच्च सेवा देवू शकतात याचा अनुभव कोरोना महामारीत कोल्हापूरकरांना आला. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासह आरोग्य सेवा उपलब्ध करुन देत जनतेची मने जिंकली. याचा पुर्नउच्चार यानिमित्ताने मंत्री सतेज पाटील यांनी केला.

डॉ. अभिनव यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी डॉ. सोनाली देशमुख याही कोरोना विरोधात लढले. डॉ. सोनाली या एमबीएस, डीएनबी आहेत. सीपीआरमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून सेवा बजावत होत्या. कोरोना कक्षात इतर सहकारी डॉक्टरांप्रमाणेच जीवाची पर्वा न करता सेवा दिली. आठवड्यातून दोन वेळा तर २४ तास सेवेत होत्या. डॉ. अभिनव देशमुख सकाळी दहा वाजल्यापासून रात्री उशीरापर्यंत कामात व्यस्त असत. तर डॉ. सोनाली याही डॉ. अभिनव यांच्याप्रमाणेच कोरोना विरोधात उभ्या टाकल्या होत्या. जीवघेण्या कोरोना कक्षाऐवजी डॉ. सोनाली यांना इतरत्र ड्युटी सहज लावून घेता आली असती. मात्र, त्यांनी ते टाळत, प्रथम डॉक्टर हे आपले कर्तव्य पार पाडले . कोरोनाची महामारी येताच खासगी रुग्णालयाव्दारे सेवा देणाऱ्या काही डॉक्टर्संनी दवाखाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. प्रशासनाने कारवाईचा इशारा दिल्यानंतर अनेक दवाखाने सुरू झाले. यापार्श्वभूमीवर डॉ. सोनाली यांची सेवा आदर्शव्रत ठरली. कोरोनाच्या भयछायेतही निर्भिडपणे आणि स्वखुषीने सेवा बजावणाऱ्या डॉ. सोनाली देशमुख यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे. डॉ. अभिनव देशमुख आणि डॉ.सोनाली देशमुख हे दांपत्य कोल्हापूकरांसाठी जीवाची बाजी लावून करत असलेली सेवा पाहून, कोल्हापूरकरांनी कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत घरात बसावे, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे सौजन्य पाळावे, ही अपेक्षा सार्थ ठरवली. आपल्या वर्दीप्रती, कर्तव्याप्रती, असलेल्या अधिकार आणि सामाजिक सुरक्षेप्रतीच आपण सरफरोश असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून देणाऱ्या डॉ. अभिनव देशमुख यांचा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी फ्रंटरनर म्हणून गौरव करुन कार्याची आठवण करुन दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER