डॉ. अभिनव देशमुख पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी : शैलेश बलकवडे नवे एस पी

Abhinav Deshmukh as Pune Rural Superintendent of Police- Shailesh Balkwade as new SP

कोल्हापूर : जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Dr. Abhinav Deshmukh) यांची पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी ( Pune Rural Superintendent police) बदली झाली.त्यांच्या ठिकाणी गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे ( Shailesh Balkwade ) यांची नियुक्ती झाली आहे. राज्यातील पोलिस दलामध्ये गुरुवारी रात्री बदल्यांचा आदेश निघाल. पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपायुक्त दर्जाच्या २२ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत.

सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्या बदलीचा आदेश निघाला आहे. तर सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम यांची सांगलीच्या पोलिस अधीक्षकपदी वर्णी लागली आहे. सुहैल शर्मा यांना अजून नियुक्ती देण्यात आली नाही. गेडाम हे २०११ मध्ये आयपीएस झाले आहेत. बीड येथे त्यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे.

रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक प्रविण मुंढे यांची जळगावच्या पोलिस अधीक्षकपदी बदली झाली.सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची अहमदनगरच्या पोलिस अधीक्षकपदी तर पोलिस उपायुक्त गुन्हे विभाग मुंबई येथील राजेंद्र दाभाडे यांची सिंधुदुर्गच्या पोलिस अधीक्षकदी नियुक्ती करण्यात आली आहे.दहशतवाद विरोधी पथक मुंबईचे पोलिस उपायुक्त मोहितकुमार गर्ग यांची रत्नागिरी पोलिस अधीक्षकपदी बदली झाली. राज्य राखीव पोलिस बलाचे समादेशक गट १३ नागपूर येथील निखील पिंगळे यांची लातूरच्या पोलिस अधीक्षकपदी बदली झाली. कोल्हापुरात डॉ. अभिनव देशमुख यांची कारकीर्द प्रभावी राहिली. त्यांनी मटका आणि अवैध धंदे याविरोधात कडक कारवाई केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER