महाविकास आघाडीने राज्यपालांना यादी दिली की नाही यावर शंका – प्रवीण दरेकर

Pravin Darekar

मुंबई :- विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीवरून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आले आहेत. आपल्या कार्यालयात महाविकास आघाडी सरकारकडून (Mahavikas Aghadi) शिफारस केलेल्या नावांची यादी आली नसल्याचे राजभवनाकडून सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे राज्यपाल मुद्दामपणे आमदारांच्या नियुक्तीला विलंब करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी महाविकास आघाडीला ती यादी जाहीर करण्याची मागणी केली आहे

विधानपरिषदेचा १२ सदस्यांच्या नियुक्तीचा विषय न्यायालयात आहे. त्यामुळे थोडी वाट बघावी लागणार आहे. अनिल गलगली (Anil Galgali) यांनी माहिती मागितल्यानंतर अशी यादी नसल्याची माहिती राजभवनाकडून देण्यात आली आहे. यांनी नावच दिली आहे की नाही अशी शंका आता उपस्थित झाली आहे. यामध्ये कोणती नावे दिली आहेत. याबाबत त्या १२ नावांची यादी राज्य सरकारने जाहीर करावी. १२ जागा रिक्त असतानाही ५० जणांना विधानपरिषदेवर पाठवण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. यामुळे जर पेपर लिक झाला तर इतर सदस्य काय प्रतिक्रिया देतील यामुळे जेवढे गुलदस्त्यात हे प्रकरण ठेवता येईल तेवढे फायद्याचं ठरणार आहे. त्यामुळे सरकारने ही नावे जाहीर करावी असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

राज्यात २ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहे. पालक विद्यार्थी, इतर विद्यार्थ्यांना पकडून ही संख्या ५ कोटीच्या आसपास आहे. ते सर्वच आज चिंताग्रस्त आहेत. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) बोलत नाही. कोकणातील वादळामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना १ रुपयाची मदत अद्याप मिळाली नाही. त्यावरही त्यांना बोलायला वेळ नाही परंतु १२ आमदारांबाबत बोलायला संजय राऊतांना वेळ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

ही बातमी पण वाचा : महाविकास आघाडी सरकारच जनतेच्या मानगुटीवर बसलेला कोरोना ; दरेकरांचा राऊताना टोमणा

कोरोना (Corona) लसींच्या बाबतीत संजय राऊत यांनी राज्यपालांनी केंद्र सरकारसोबत बोलावं असा सल्ला दिला आहे. मदतीच्या बाबतीत केंद्र सरकारकडे पत्राने मागणी होत नाही त्यासाठी प्रस्ताव राज्य सरकारकडून जात असतो. यांनी प्रस्ताव पाठवायचा नाही परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी (Bhagat Singh Koshyari) बोलाव अशी अपेक्षा असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. याचा अर्थ राज्य सरकारवर संजय राऊतांचा भरोसा नाही. राज्य सरकारची कुवत नसल्यामुळे राज्यपालांना बोलायाल सांगितले जात आहे का? असा घणाघात प्रवीण दरेकरांनी केला आहे.

भाजपचा प्राणवायू संपेल असं संजय राऊत म्हणाले. मात्र भाजपचा (BJP) प्राणवायु प्रचंड आहे. देशातील जनेतेने भाजपला जनाधार देऊन भाजपचा सतत प्राणवायु वाढवण्याचे काम केले आहे. अलिकडे पंढरपुरात विठ्ठलाच्या भूमिवरही तिथल्या जनतेले प्राणवायू वाढवला आहे. आपल्या नाकातोंडातल्या नळ्या काढून घेतल्या आहेत. अशी तिरस्कारातून भूमिका येत असेल तर दुर्दैवी असल्याचे प्रवीण दरेकरांनी म्हटले आहे.

शिवसेनेची सामाजीक बंधिलकी हा शिवसेनाचा प्राणवायू होता. अलिकडच्या काळात ती बांधिलकी दिसत का नाही हे याचा विचार संजय राऊतांनी करायला हवा. निसर्ग वादळ, तौत्के चक्रीवादळ झाले. कोकणात कुठेही शिवसेना नजरेस पडली नाही. कोरोनाच्या काळात कुठेही रस्त्यावर दिसली नाही. भाजप कौले, कापडं, पत्रे देऊन मदत करत आहे. कधीकाळी शिवसेना आपत्ती झाली की, वस्तु धान्य गोळा करुन नुकसान झालेल्या भागात पोहचायचे परंतु आता सत्ता त्यांचा प्राणवायु आहे. सत्ता ही काही काळासाठी असते. शिवसेनेचा प्राणवायु हरपला आहे. त्यामुळे ऑक्सिजनविना शिवसेना (Shiv Sena) अशा गत झाली आहे. यामुळे याची जास्त चिंता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी करावी, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

ही बातमी पण वाचा : जमिनीला पाय लावण्यासाठी कोकणात गेले होत का? दरेकरांचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button