पश्चिम बंगाल : १ जूनपासून उघडणार धार्मिक स्थळे

Mamata Banerjee

कोलकाता :- पश्चिम बंगालमध्ये धार्मिक स्थळे १ जूनपासून जनतेसाठी सशर्त खुली होतील, असे आदेश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. तसेच ८ जूनपासून सरकारी कर्मचारीही कामावर परततील असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

धार्मिक स्थळं खुली होतील, मात्र तिथे गर्दी करता येणार नाही. एका वेळी मंदिरात, मशिदीत किंवा चर्चमध्ये फक्त १० लोकांना प्रवेश देण्यात येईल. सर्व धार्मिक स्थळांचे रोज निर्जंतुकीकरण करण्याची व्यवस्था असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मोदी सरकार हा निर्णय स्वीकारेल, अशी मला खात्री आहे, असा विश्वास ममता यांनी व्यक्त केला.

८ जूनपासून राज्यातील सगळ्या सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी कामावर परततील. १ जूनपासून पश्चिम बंगालमधली ज्यूट उद्योग सुरू होईल असे त्या म्हणाल्या. पश्चिम बंगालमधले रस्ते, जिल्ह्यांमधले रस्तेही खुले होतील, असेही ममता यांनी सांगितले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER