चिंता करु नका, आमचे अजितदादा खंबीर – निलेश लंके

Nilesh Lanke - Ajit Pawar

अहमदनगर :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक करून शासनाच्या खर्चासह गावात एकात्मता आणि प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या ग्रामपंचायतींना आमदार निधीतून 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार निलेश लंकेंनी केली आहे. त्यामुळे आता गावागावात ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्याची दिलेले प्रलोभन योग्य नाही, अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास हा निधी आणणार कोठून, अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आमदार लंके यांना टोला लगावला आहे.

यावर आता निलेश लंकेंनी प्रवीण दरेकरांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मी घोषणा केल्यानंतर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. असे असताना दरेकर मात्र विरोधात बोलत आहेत. त्यामुळे दरेकर यांनी निधीची चिंता करू नये. चांगल्या कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आम्हाला पुरेसा निधी देतील, असे आमदार लंके यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER